चांगला शेअर कसा निवडावा?

शेअर कसा निवडावा: पाहण्यात आहे की, गुंतवणूकदार शेअर बाजारात भांडवल गुंतविण्यापूर्वी तिपा व सल्ला अवश्य इच्छितात व मागतात. असे गुंतवणूकदार फार कमी असतील जे स्वत: सल्ल्याशिवाय गुंतवणूक करीत असतील. हेच महत्त्वाचे ठरवून व लक्षात घेऊन येथे काही टिप्स दिल्या आहेत, ज्या गुंतवणुकीच्या वेळी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

शेअर कसा निवडावा

साधारण आर्थिक ट्रेंड

सर्वप्रथम टॉप डाऊन अॅप्रोचमध्ये आपण साधारण अर्थव्यवस्थेवर एक नजर टाकू. अर्थव्यवस्था ही समुद्रातील एखाद्या लाटेसारखी असते. जेव्हा की विभिन्न औद्यागिक समूह आणि व्यक्तिगत कंपन्या सारख्या आहेत. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येते तेव्हा हे समूह व कंपन्या नफा कमावतात आणि अर्थव्यवस्थेच्या उतारादरम्यान या कंपन्या व समूह नकारात्मक परिणाम करतात.

समूहाची निवड

बाजारात औद्योगिक समूहाची सक्रियता निर्धारित करण्याकरिता गुंतवणूकदार विकास दर, मार्केट साईज आणि अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे विश्लेषण जरूर करू इच्छितो. जसजसे शेअर चढ-उतार करू लागतात तसतसे तो समूहसुद्धा चढ-उतारातून जात असतो, जे गुंतवणूकदारांवर प्रभाव पाडतात.

सर्वश्रेष्ठ निवड

समूहाची निवड केल्यानंतर गुंतवणूकदाराला समूहाच्या विभिन्न कंपन्यांचे विस्ताराने विश्लेषण केले पाहिजे, जे स्वतःच्या सेक्टरमध्ये सर्वश्रेष्ठ ठरतील. अशा प्रकारच्या कंपन्यांत त्या कंपन्यांची गणना केली जाते ज्या स्वतःच्या विस्ताराविषयी नेहमी आश्वस्त असतात. यात त्या कंपन्यासुद्धा असू शकतात, ज्या नवीन व्यवस्थापन लक्ष्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्नशील आहेत. एक गुंतवणूकदार त्या कंपन्याचीसुद्धा चौकशी करू शकतो ज्या मोठ्या पातळीवर आणि तांत्रिक सहयोगाने आपला फायदा वाढविण्यासाठी संयुक्त कार्य करीत आहेत. आपणास सर्वांत अगोदर कंपनी किंवा समूहाचा व्यवसाय, स्पर्धायुका वातावरण आणि भविष्याविषयीच्या योजना समजून ध्याव्या लागतील.

कंपनीचा स्तर कोणत्या प्रकारचे मार्किट शेअर, उत्पादन आणि प्रतिस्पर्ध्या द्वारा निर्धारित होते. वर्तमान पुढारी कोण आहे? आणि एका शेअरमध्ये होणारे बदल कोणत्या प्रकारे वर्तमान संतुलनावर परिणाम करतात. कोणत्या कंपनीच्या विरोधी वातावरणाचा अभ्यास योग्य आणि चुकीच्या कंपनीची निवड निर्धारित करतो.

गुंतवणूकदाराला प्रति शेअर मूल्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा अभ्याससुद्धा केला पाहिजे. सर्वांत अगोदर अशा कंपन्यांची निवड केली पाहिजे जी सकारात्मक उत्पन्नाविषयी सदैव आश्वस्त आहे आणि ज्यांचे उत्पन्न सकारात्मक आहे. हा डाटा कंपन्याच्या वार्षिक डाटा विभागातून प्राप्त करता येतो.

वार्षिक विकास दर

कंपनीच्या दीर्घकालीन फायद्यासाठी विकास दर आधाराचे काम करतो, याला असे मानता येईल. जर चालू आर्थिक वर्षाचा लाभ पूर्वीच्या ५ वर्षांच्या तुलनेत दुप्पट असेल तर याचा अर्थ आहे, की विकास दर १५ टक्के वर्षाला या हिशेबाने वाढत आहे. या प्रकारचे तुलनात्मक अध्ययन औद्योगिक समूहाच्या सरासरीने प्रमाणानेसुद्धा करता येते.

नफा-तोट्याचे मूल्यांकन

गुंतवणूकदार कंपनी वा फर्मची तिमाही विक्री आणि प्रतिशेअर विक्रीच्या परिणामाचे भागील तिमाहीच्या तुलनात्मक अभ्यासानंतर नफा वा तोट्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येते. तिमाही तोटा कोणत्याही कंपनीच्या भविष्यासाठी शुभ संकेत असू शकत नाही आणि गुंतवणूकदाराला या तोट्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयन्त केला पाहिजे.

लाभ प्रमाण प्रवृत्ती (प्रॉफिट मार्जिन ट्रेंड)

गुंतवणूकदार ज्या कंपनी व फर्मच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छितो त्याला त्या कंपनीचा निव्वळ नफ्याचे प्रमाण आणि त्याच्या ट्रेंडचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. आयकराचा दर अधिकांशत: स्थिर राहत नाही तेव्हा याच्या करातून अगोदरच नफा प्रमाण ट्रेंड प्री प्रॉफिट मार्जिनचे चांगलेच अंदाज करता येतात. करपूर्व नफा प्रमाणात फरक फक्त कराच्या दराचा असतो. वार्षिक नफा आणि तोटा खाते निव्वळ नफ्याच्या अगोदरच आयकराचा दर दर्शवितो. हाच दर जर गत पाच वर्षांत अधिकांशत: स्थिर असेल तर आपण निव्वळ नफ्याचे प्रमाण शोधू शकतो.

कर्ज/इक्विटी

कोणत्याही कंपनीचे कर्ज/इक्विटी प्रमाण या गोष्टीवर अवलंबून असते की ते कोणत्या उद्योगात कार्यरत आहे. उदाहरणासाठी गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणारे उद्योग जसे की, ऑटो मॅनुफॅक्चुरिंगमध्ये हे प्रमाण दोनपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. व्यक्तिगत उपयोग असणाऱ्या कॉम्पुटर कंपनीत ०.५ पेक्षा कमी. जर कंपनीत वाढत असणाऱ्या गतिविधीच्या कार्यक्षेत्रासाठी पैसा जमा करण्यासाठी जास्त कर्ज घेतले जाते तेव्हा कंपनीचे उत्पन्न या कर्जाविना होणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त होण्याची शक्यता असते. जर या कर्ज पुरवठ्यामुळे उत्पन्न कर्जाची गुंतवणुकी (व्याज) पेक्षा जास्त वाढली तर शेअरधारकांना (शेअर होल्डर्स) फायदा होती. कारण वाढलेले उत्पन्न तेवढयाच शेअर धारकांपर्यंत याविरुद्ध जर कर्जपुरवठयाची लागत यापासून होणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त होत असेल तर कंपनी दिवाळखोरीत निघण्याचा धोका निर्माण होतो. ज्याचा परिणाम शेवटी शेअरधारकावर होतो.

प्रतिशेअर उत्पन्न (रिटर्न ऑन इक्विटी)

आर. ओ. आय (रिटर्न ऑन इक्विटी) वा प्रति शेअर उत्पन्न शुद्ध नफा (एन. पी.) शेअरधारकांची सरासरी इक्विटी.

पण हेसुद्धा खरे आहे की, सर्व उच्च आर. ओ. आय. असणाऱ्या कंपन्यामध्ये गुंतवणूक योग्य नसते. काही कंपन्यांचा आर. ओ. एफ. उच्च असतो पण त्यांच्याजवळ संपत्ती (असेट्स) नसते, जशा की कन्सल्टिंग फर्म. तर काही उद्योगांना नफ्याचा पहिला पैसा कमावण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचे असते. जसे की तेल उत्पादक कंपनी व ऑईल रिफायनर्स. यामुळे फक्त आर. ओ. ई. च्या आधारावर आपण कन्सल्टिंग फर्मला ऑईल रिफायनरीपेक्षा चांगली गुंतवणूक मानू शकत नाहीत. साधारणपणे जास्त भांडवलाची आवश्यकता असणाऱ्या उद्योगात सुरुवातीला जास्त अडथले असतात त्यामुळे प्रतिस्पर्धा कमी असते. त्याच वेळी उच्च आर. ओ. ई. असणाऱ्या फर्मला जिचे असेट्स कमी असतात जास्त प्रतिस्पर्धेचा सामना करावा लागतो. कारण कमी भांडवलाच्या जरुरीमुळे कोणीही तसे काम सुरू करू शकते. याशिवाय अन्य आर्थिक प्रमाण सूत्रांच्या तुलनेत आर. ओ. ला तुलनेसाठी सर्वांत चांगले समजले जाते.

वाढीचा दर

(ग्रोथ रेट) ग्रोथ रेट = रिटेंशन रेट = आय. ओ. ई. उच्च आर. ओ. ई. पासून शीघ्र फायदा होत नाही. स्टॉक प्राईसला सर्वांत जास्त प्रतिशेअर उत्पन्न (ई. पी. एस.) प्रभावित करते. यामुळे शक्य आहे, की २० प्रतिशत आर. ओ. ई, कंपनीसाठी १० प्रतिशत आर. ओ. ई. कंपनीच्या तुलनेत उत्पन्न दोन पटींनी (प्राईस/बुक टर्म्समध्ये) देत असतात. आपल्याचा नफा जास्त उच्च दराने उत्पन्नाच्या पुनर्गुंतवणुकीमुळे मिळतो, जी कंपनीला आणखी वरचा दर मिळवून देते. साधारणपणे आर. ओ. ई. निरर्थक ठरते, जर उत्पन्न परत पुन्हा गुंतविले नाही तर दीर्घकालीन ग्रोथ मॉडेल्समध्ये आढलून आले आहे, की जी फर्म डिव्हीडंट देते तिच्या उत्पत्रात वृद्धी कमी होते. उदाहरण म्हणून जर डिव्हीडंट २० प्रतिशत दिला गेला असेल तर अंदाजित दर आर. ओ. ई. वाढीचा ८० प्रतिशत असेल.

आर. ओ. सी. ई.

आर. ओ. सी. ई. कंपनीमध्ये गुंतविलेल्या भांडवलाची तुलना उत्पन्नाशी करते. ही संपत्तीवरील उत्पन्ना (रिटर्न ऑन असेट्स) सारखीच आहे. पण आपण यात अर्थपुरवठ्याचे स्रोतसुद्धा लक्षात ठेवू शकता. प्रत्येक डिनॉमिनेटरमध्ये आपल्याजवळील एकूण संपत्तीऐवजी फक्त संपत्ती (नेट असेट्स) किंवा लागलेले भांडवल असते. जेव्हा की (न्यूमरेटर) करपुलाची कार्यरत लाभ व ईबी. आयटी. (प्री. टॅक्स ऑपरेटिंग प्रॉफिट) असतो. लागल्या भांडवल (कॅपिटल एम्प्लॉईड) ची एक परिभाषा असते. साधारणपणे हा उद्योग सहज सरळ ठेवण्यासाठी आवश्यक भांडवलाच्या रूपात केला जातो. लोकप्रिय रूपातही एकूण संपत्तीमधून चालू दायित्व किंवा अचल संपत्ती आणि चालू भांडवल कमी करून परिमाणाच्या रूपात केले जाते. याला आपण गुंतविलेले भांडवल = एकूण संपत्ती – चालू दायित्व किंवा अचल संपत्ती चालू भांडवल या सूत्ररूपात व्यक्त करू शकतो.

पुढे वाचा:

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *