शेअर बाजाराची माहिती

शेअर बाजाराची माहिती: जर आपण शेअर बाजाराविषयी उत्सुक आहात तर आपणासाठी आवश्यक आहे की, आपणास ती आवश्यक माहिती, भांडवली बाजाराची विशिष्ट शब्दावली माहीत पाहिजे ज्याचा उपयोग शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे आपणास शेयर बाजारात देणेघेणे सोपे होईल आणि आपली महिती परिपूर्ण असल्या मुळे आपण कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीपासून दूर राहू शकाल.

कंपनी कशाला म्हणतात?

शेअर बाजारात प्रवेश करण्यापूर्वी आपण जी शब्दावली सर्वप्रथम ऐकतो आणि सर्वात अगोदर जिचा संबंध येतो ती आहे कंपनी. ‘कंपनी’ शब्द मूळ रुपाने लॅटिन मधून घेतला आहे, ज्यात ‘Com’चा अर्थ ‘सोबत’ आणि ‘Panis’चा अर्थ ‘भाकरी’ आहे. प्रारंभी ‘कंपनी’ अशा काही व्यक्तींच्या समूहाला म्हटले जात होते जे आपली भाकरी सोबत मिळून खात होते. हळूहळू हा शब्द व्यापाऱ्यांची ओळख होऊन गेला, कारण त्या काळी बहुतेक व्यापारी लोक नेहमी आपले व्यावसायीक सौदे भोजन करताना पार पाडायचे यामुळे व्यापार करणाऱ्या संस्थेचे नाव कंपनी पडले; पण वर्तमान काळात याच्या अर्थात खूप बदल झाले. आता कंपनीचा आशय असा संध झाला आहे जीमध्ये संयुक्त भांडवल असते.

आता कंपनी आपल्या विस्तृत अर्थाने असे व्यापारी संघटन, जे काही लोक (शेअर-होल्डर) एखादा व्यापार चालविण्यासाठी स्थापन करतात.

हेच शेअर-होल्डर कंपनीचे काम व्यवस्थितपणे चालविण्यासाठी आपले प्रतिनिधी मंडळ निवडतात. त्याला ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ‘ म्हणतात.

दुसऱ्या शब्दांत कंपनी विभिन्न मनुष्याचा तो समूह आहे ज्याची स्थापना एखाद्या विशेष उद्देशासाठी केली जाते. हा संपूर्णपणे कायदेशीर समूह असतो, ज्याची निर्मिती विद्यमान कायद्या अंतर्गत केलेली असते. ज्याची जबाबदारी मर्यादित आणि अस्तित्व त्याच्या सदस्यांपुरते असते. सैद्धान्तिक दृष्टीने कंपनी दोन वर्गांमध्ये विभागली जाते (१) भागीदारी (२) वैयक्तिक मालकी. वैयक्तिक मालकी असणाऱ्या व्यवसायांचे संचालन एकच व्यक्ती करते. तीच व्यक्ती व्यवसायात होणाऱ्या नफा-तोट्याला पूर्णपणे जबाबदार असते. तर भागीदारी प्रतिष्ठानात दोन वा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एखादा व्यवसाय लाभाच्या उद्देशाने करतात.

व्यवसाय शुरू करणे आणि तो चालू ठेवण्यासाठी जो पैसा मूळ पैशाच्या स्वरूपात लावला जातो त्याला ‘कॅपिटल’ म्हणतात. हे सुरवाती कॅपिटल शेअर होल्डर कडून घेतले जाते, कारण ते कंपनीचे भागीदार मालक असतात. शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या भांडवलास ‘ईक्विटी कॅपिटल’ म्हणतात. कंपन्या बँका, आर्थिक संस्था आणि जनतेकडून उधार घेऊन सुद्धा या कॅपिटलची सोय करतात. जनतेकडून हा पैसा ‘डिबेंचर’ (कर्जरोखे) ची विक्री करून कंपनी घेते किंवा फिक्स्ड डिपाझिट मार्फत. डिबेंचरची खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराला ‘डिबेंचर होल्डर’ म्हणतात. कंपनी या लोकांची कर्जदार असते. दुसऱ्या शब्दांत यांचे पैसे फेडण्यास कंपनी जबाबदार असते. त्याच वेळी शेयर-होल्डर्स कंपनीचे मालक असतात.

शेअर होल्डर्सचे कायदेशीर अधिकार

कायदा असे मानतो की शेअर होल्डर्स कंपनीच्या कोणताही निर्णय, कार्यपद्धती किंवा व्यावसायिक कराराशी प्रत्यक्षात संबंधात नसतो म्हणून त्याचा वैधानिक अधिकार आणि उत्तरदायित्व दोन्हीही मर्यादित असतात. कायद्यात कंपनीचे वेगळे स्थान आहे आणि शेअर होल्डर्सचे वेगळे. कंपनी आपल्या भागधारकांच्या परस्पर आपले प्रत्येक प्रकारचे व्यावसायिक करार करू शकते, मालमत्तेची खरेदी-विक्री करू शकते, कर्ज घेऊ शकते. कंपनीत काम करणाऱ्या संचालकांच्या कोणत्याही कृत्यासाठी शेअर-होल्डर्स जबाबदार नाहीत. एका भागधारकाची सर्व जबाबदारी त्या कंपनीतील त्याच्या शेयर्सच्या मूल्याएवढीच मर्यादित असते. ही त्याची फक्त ‘आर्थिक जबाबदारी असते जी, कंपनीचे शेअर खरेदीनंतर पूर्ण होते.

उदाहरणासाठी समजा की एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे १० रुपयाचे १०० शेयर खरेदी केले तेव्हा कंपनीप्रती त्या व्यकतीची आर्थिक जबाबदारी १००० रुपयाची झाली जी शेयर खरेदीनंतर पूर्ण झाली. यानंतर जरी ती कंपनी दिवाळखोरीत निघाली तरी जास्तीत जास्त शेअर मार्केटमध्ये तिचा भाव शून्य होऊ शकतो म्हणजेच आपण आपले १००० रुपये गमावले पण कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा वा नैतिक रुपाने आपली कंपनी देणेकऱ्यांची परतफेड करण्यासाठी सांगू शकत नाही. या नियमाला वैधानिक भाषेत मर्यादित जबाबदारी वा ‘लिमिटेड लायबिलिटी’ म्हणतात.

प्रत्येक कंपनी आपल्या नावापुढे ‘ लिमिटेड ‘ शब्द वापरते हे कायद्याने बंधनकारक आहे यामुळे हे स्पष्ट होते की, कंपनीच्या भागधारकांची आर्थिक जबाबदारी मर्यादित आहे. यामुळे जेव्हा आपण एखाद्या कंपनीचाशेअर खरेदी करता तेव्हा पूर्ण निश्चित राहू शकता की, आपल्याला कंपनीच्या आर्थिक व कायदेशीर असण्याशी, अडचणीशी काहीही देणे-घेणे नाही.

आपण खरेदी केलेल्या शेअर्सचे मालकी हक्क आपण मिळवू शकता शेअर म्हणजे चल संपत्ती असतात. भागधारक याची इच्छेनुसार खेरदी-विक्री करू शकतो, भेट म्हणून कुणलाही देऊ शकतो, बक्षीसपत्र, मृत्युपत्र, वारसापत्र करू शकतो. यामध्ये कोणतीही कायद्ययाची बाबा त्याच्या मार्गात येऊ शकत नाही. कंपनीचे आपले स्वतःचे अस्तित्व असल्यामुळे शेअर-होल्डर रूपी मालक बदलल्यामुळे तीला काही फरक पडत नाही. कंपनी जेव्हा आपला व्यवसाय सुरू करते तेव्हा तिचे शेअर्स अंकित मूल्य (Face Value) नुसार सरळ खरेदी करता येतात. यातूनच कंपनी आपले सुरूवातीचे भांडवल उभे करते. त्यानंतर शेयर बाजारात होणाऱ्या सौद्यांचा कंपनीवर काहीही परीणाम होत नाही. एक उदाहरण पाहू –

समाज की एखाद्या कंपनीचा १० रुपयांत इश्श्यू केलेला एखादा शेअर बाजारात २००० रुपये प्रति शेयर या भावाने विकला जात आहे, तर याचा अर्थ हा आहे का कंपनी अगोदरच २० पट अधिक संपन्न झाली आहे? नाही उलट याचा अर्थ हा आहे की बाजारात शेअरचे खरेदीदार कंपनीला चांगले समजत आहेत आणि गुंतवणूकदार तिच्या शेअरला २००० रुपयांत खरेदी करण्यासाठी तयार आहेत.

कंपन्यांचे प्रकार

कंपन्या दोन प्रकारच्या असतात (१) पब्लिक लिमीटेड कंपनी आणि (२) प्रायव्हेट लिमीटेड कंपनी. प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे शेयर बाजारामार्फत खरेदी-विक्री केले जात नाहीत या कंपन्याना आपले शेयर जनतेमध्ये विकण्याची परवानगी नसते.

सदस्य यादी

सदस्यांची संपूर्ण माहिती, त्यांना लाभांश, राईट्स शेअर वा बोनस शेअर्स वगैरे पोचविण्याच्या सुविधांसाठी प्रत्येक कंपनी आपल्या भागधारकाची यादी ठेवते. या यादीमध्ये शेअर होल्डरचे नाव, पत्ता आणि अन्य आवश्यक माहिती समाविष्ट असते.

आजकाल ही माहिती नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझीटरीडिपाझिटरी लिमिटेड (NSDL), सेंट्रल सिक्यूरेटीज डिपाझिटरी लिमिटेड (CSDL) यांच्याकडे सुद्धा ठेवली जाते.

वार्षिक माहिती

प्रत्येक कंपनी आपले कामकाज आणि खात्यांच्या माहितीसोबत एक वार्षिक अहवाल तयार करते. ही सर्व माहिती सर्व भागधारकांना कंपनीच्या वार्षिक सभा व (Annual General Board Meeting) च्या काही दिवस अगोदर पाठविली जाते. या वार्षिक रिपोर्टसोबत कंपनीचे बॅलन्सशीट (Balance Sheet) आणि नफा-तोटा हिशेब (Profit & Loss Account) सुद्धा असतो. ही माहिती भाग-धारक आणि नवीन गुंतवणूकदारास, जे या कंपनीत गुंतवणूक करण्याविषयी विचार करीत आहेत बरीच आवश्यक असते.

हा अहवाल घोषित कंपनीत व्यवसायाची स्थिती, भविष्यातील योजना, लाभांशाची घोषणा आणि अशा अनेक गोष्टींचा खुलासा करतो. ज्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक स्थितीवर होतो. हा अहवाल खरा असल्याची खात्री गुंतवणूकदार ऑडिटरच्या अहवाला वरुन करून घेऊ शकतात.

नवीन गुंतवणूकदारांसाठी या वार्षिक अहवालाची माहिती अत्यंत आवश्यक एवढयाकरिता असते की तो गुंतवणुकीपूर्वी त्या कंपनीची संपूर्ण स्थिती आणि स्वतःच्या गुंतवणुकीविषयीच्या भवितव्याबाबत पूर्णपणे निर्धास्त होऊ शकेल.

शेअर्सचे प्रकार

शेअर्स आपल्या बाजाराची स्थिती आणि सिद्धांतानुसार प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात (१) प्रिफरन्स शेअर आणि (२) इक्विटी शेअर्स

१. प्रिफरन्स शेयर (Preference Share)

हे शेअर्स असे असतात ज्यांवर लाभांशाचा दर निश्चित असतो. जर कोणत्याही परिस्थीतीत कंपनी बंद झाली तर लाभांश आणि मूल भांडवलाच्या परतफेडीवर या शेअर्सचा अधिकार इक्विटी शेअर्सच्या अगोदर असतो. जर कोणत्याही परिस्थितीमध्ये कंपनी बाजारात नफा कमवू शकत नसेल तर किंवा या भागधारकाना लाभांश देऊ शकत नसेल तर ती बहूमेलेटिव्ह शेअर जारी करते. या शेअर्सचा अर्थ असतोकी जेव्हा कंपनी नफा कमावीत असते आणि तिच्याकडे पैसे येतात तेव्हा ती आपला मागील सर्व बाकी लाभांश देते.

दुसाऱ्या शब्दांत प्रिफरन्स शेअर होल्डर्सना कंपनीच्या नफा व नुकसान यांची पर्वा नसते. यांचा निश्चित लाभांश कायम असतो. परंतु; याबरोबरच प्रिफरन्स शेअर होल्डर्सना त्यांचे भांडवल तोपर्यंत परत मिळत नाही जोपर्यंत कंपनी चालू आहे. फक्त एक प्रकारच्या प्रिफरन्स शेअर्सना हा नियम लागू पडत नाही ‘रीडयेबल प्रिफरन्स शेअर’. या शअर्सचे मूळ भांडवल एक निश्चित अवधी पूर्ण झाल्यानंतर परत करावे लागते.

२. इक्विटी शेयर (Equity Share)

या प्रकारच्या शेअर्सवर निश्चित लाभांशाची हमी नसते. सरळ शब्दांत सांगायचे म्हणजे या शेअर्सवर कोणताही लाभांश मिळण्याची कोणतीही खात्री नसते. जो गुंतवणूकदार अधिकतम जोखीम घेऊन अधिक लाभ कमविण्यासाठी इच्छुक आहे, त्याच्यासाठी इक्विटी शेअर्सचा पर्याय आसतो. पण हे भागधारक कोणत्याही वर्षात लीभांश मिळविण्याचा अधिकार बाळगतात. इक्विटी भागधारकांनाच कंपनीचे मालक मानले जाते. या भागधारकांना कंपनीत सर्व महत्त्वपूर्ण मत देण्याचे अधिकार असतात.

कंपनीच्या वार्षिक बैठकीत यांच्या प्रस्तावित लाभांशाची घोषणा केली जाते. यात प्रत्यक्ष लाभांश वजा करून एकूण अंश विभाजीत केला जातो.

इक्विटी शेअर्समध्य सर्वांत जास्त धोका असतो आणि त्यानुसार त्याच्या प्रमाणात सर्वांत जास्त लाभ असतो. कंपनीच्या प्रगतीचा सर्वांत जास्त फायदा त्यांनाच मिळतो. जेथे प्रिफरन्स शेअर्सवर ठरावीक निश्चित लाभ मिळतो तेथे ईक्विटी शेयर्सवर नक्यासोबत लाभ वाढत असतो.

शेअर्सचे अन्य काही प्रकार

प्रिफरन्स आणि इक्विटी शेअरशिवाय सुद्धा शेअर्सचे इतर प्रकार आहेत.

१. राइट्‌स शेयर (Rights Share)

कंपनी जे शेअर्स आपल्या मूल भांडवलात वृद्धीसाठी वेळोवेळी प्रचलित करते त्यांना राइट्‌स शेअर म्हणतात. एका प्रकारे हे ईक्यिटी शेयर्सच असतात. यांना राइट्‌स शेअर एव्हड्यासाठी म्हणतात की यांच्या खेरदीचा पहिला हक्क कंपनीच्या जुन्या भाग धारकांना असतो. ज्या भागधारकांजवळ जेवढे शेयर्स असतात त्याच प्रमाणात यांची विक्री करण्यात येते. जर नवीन राइट्‌स शेअर्स त्याच भावात विकले जात असतील ज्या भावात जूने शेअर्स विकले गेले होते तेव्हा ते अॅटवार आणि जर त्यांची किंमत वाढलेली असेल तर त्यांना ‘प्रिमिअम’ म्हणतात.

२. बोनस शेयर्स (Bonus Share)

आपल्या भांडवलाच्या वृद्धीसाठी कंपनी अंशरूपात शेअर प्रचलित करते त्यांना बोनस शेअर्स म्हणतात. त्याचे एक नाव भांडवली अंश आहे. बोनस शेअर पासून अंशधारकांच्या अंशात वृद्धीबरोवर जास्त लाभांश कमविण्याची संधी असते. जेव्हा एखाद्या कंपनीजवळ लाभांशाची रक्कम मोठ्या स्वरूपात जमा होते तेव्हा कंपनी ती बोनस शेयरच्या रूपात ठेवी/भांडवलामध्ये परिवर्तित करते. यामुळे एखादी कंपनी प्रथम बोनस अंश निर्गमनानंतर बारा महिन्यांनी याचा बोनस अंश जारी करते. यामध्ये भागधारकांना संचयाचा भाग लाभांश रूपात न मिळता अंशरूपात मिळतो.

एका उधाहरणाने समजणे सोपे होईल. समजा एक कंपनी ‘क्ष’ आपल्या भागधारकांना १: २ च्या प्रमाणात बोनस अंश प्रचलित त्यावर मिळणारा लाभांश प्रनपाध शेअर कॅपिटल = रु १,००,०००

१,००,००० शेअर @ १० प्रत्येकी

संचित जमा = रुपये २,००,०००

समजा एखाद्या व्यक्तीजवळ या कंपनीचे १०,००० शेअर्स रुपये १० च्या हिशेबाने रुपये १,००,००० मूल्यामध्ये आहेत. या कंपनीद्वारा बोनस अंश निर्गमित केल्यानंतर ५,००० बोनस अंश दिले जातील (१०,००० X १/२)

बोनस अंशाच्या निर्गमनानंतर त्या व्यक्तीजवळ या कंपनीचे १५,००० अंशवर मिळेल आणि त्याचा लाभांश दर वाढेल.

पुढे वाचा:

शेअर म्हणजे काय?

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.