शेअर गुंतवणूक कशी करावी?

शेअर गुंतवणुकीसंबंधी आवश्यक माहिती

१. स्टॉक एक्सचेंज

‘स्टॉक एक्सचेंज’ एक संघटित भांडवली बाजार आहे. येथे कंपनी-शेअरचे खरेदीदार व विक्रेते स्टॉक दलालाद्वारा त्यांची खरेदी विक्री करतात. याला ‘स्टॉक मार्केट’ सुद्धा म्हणतात. स्टॉक एक्सचेंज मध्ये शेअर्सची खरेदी विक्री लायसन्स प्राप्त शेअर दलालच्या माध्यमातून करता येते. दलालासाठी दलालीचा दर ठरबवून दिलेला असतो, त्याला ‘ब्रोकरेज’ (दलाली) म्हणतात. भारतातील पहिल्या संघटित स्टॉक एक्सचेंजची स्थापना मुबई येथे सन १८८७ मध्ये ‘नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन’ (Native Share and Stock Broker Association) या नावाने झाली.

या वेळी देशात एकूंण बावीस (२२) मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज मुंबई, कोलकत्ता, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगलोर, इंदूर, कोचीन, कानपूर, पुणे, लुधियाना, गुवाहाटी, मंगरूळ, पटना, जयपूर, कटक, भुवनेश्वर, मेरठ, कोइंबतूर, राजकोट आणि बडोदा मध्ये आहेत. मुंबईमध्ये तीन स्टॉक एक्सचेंज आहेत BSE, NSE, OTC.

स्टॉक एक्सचेंज उपयोग

स्टॉक एक्सचेंज उपयोग खालील प्रमाणे आहे.

  • स्टॉक एक्सचेंज देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा सूचक आहे/असतो.
  • स्टॉक एक्सचेंज भांडबल निर्मितीत सहास्यक आहे.
  • स्टॉक एक्सचेंज कोणत्याही देशाच्या औद्योगिक विकासाचा निर्देशक/निदर्शक असतो.

२. ब्लु चिप (Blue Chip)

ही व्यक्तिची आवडीची शब्दरचना आहे. हा शब्द भांडवली बाजारात गुंतवणूकदार त्या कंपनीसाठी उपयोगात आणतात, जी चांगला व्यवसाय देते. यामाध्ये जास्त प्रमाणात त्या कंपन्या असतात ज्या मोठा व्यवसाय, चांगले तंत्र सुदृढ प्रशासन आणि व्यापारात इमानदारी या बळावर चांगला लाभांश देतात.

३. तेजी आणि मंदी

जवळच्या काळात ज्या शेअर्सचा भाव वाढण्याची आशा असते अश्या शेअर्सनातेजीचे म्हटले जाते. याना ‘बुल’ म्हणतात. यांच्या जास्त व्यवसाय करण्यामुळे बाजार तेजीत येतो आणि शेअर्सचा भाव वाढू लागतो. आशा बाजाराला बुल मार्केट () म्हणतात. शेअर बाजारात निराशाजनक भाव अपेक्शिणाऱ्यांना मंदीचे शेअर्स म्हणतात. यांना बिअर म्हणतात. यांच्या जास्त प्रभावाने बाजारात मंदी येते आणि याला जास्त मंदीचा बाजार म्हणतात.

४. बाय-बॅक (Buy Back)

जेव्हा एखादी कंपनी असे मानते की, बाजारात तिच्या शेअरला योग्य भावापेक्षा कमी भाव मिळत आहे तेव्हा ती स्वतःच्याच भांडवलाने स्वतःचेच शेअर परत खरेदी करते. बाजाराच्या या स्थितीला बाय-बॅक म्हणतात.

कंपनीच्या अशा कृत्यामुळे तिचे इक्विटी कपिटल कमी होते कारण बाजारातून वापस खरेदी केलेले शेअर रद्द केले जातात आणि कायदेशीरपणे त्यांना परत प्रचलित करता येत नाही. याचा फायदा असा होतो की, यामुळे दरशेअर उत्पन्न (E. P. S.) वाढते, कारण तेवढा लाभ आता पूर्वापेक्षा कमी इक्विटी कपिटलवर विभाजित होतो. याचा परिणाम असा होतो की बाजारात कंपनीच्या शेअर्सना चांगला पी./ई. मिळतो आणि शेअर्सचा भाव बायबॅक मुळे पूर्वीच्या भावापेक्षा जास्त वाढतो.

५. शेअर्समध्ये विभाजन (Stock Split)

कोणत्याही कंपनीच्या इक्विटी कपिटलवर कोणताही प्रभाव न टाकता जेव्हा एखादी कंपनी वर्तमान शेअर्स कमी भावात (फेस व्हॅल्यू) शेअरमध्ये विभाजित करते तेव्हा त्याला ‘स्टॉक स्प्लिट’ वा शेअर्सचे विभाजन असे म्हणतात. यामुळे गुंतवणूकदारांचा नफा होतो. कारण शेअर पूर्वीपेक्षा स्वस्त घेतो. यामुळे शेअर खरेदीदारांची रुची वाढते आणि बाजारात त्याचे भाव वाहू लागतात.


डीमॅट म्हणजें काय (What is Demat)

भांडवली बाजाराची दिवसेंदिवस वाढती उपयोगिता आणि व्यस्तता लक्षात घेता आता सर्व शेअर / प्रतीभूतिचे अमूर्तीकरण अनिवार्य केले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम आणि मुद्रांक शुल्क आणि खर्च समाप्त झाला आहे. नॅशनल सेक्यूरीटी डिपॉझिटरीसाठी आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लि. बुक एन्ट्रीच्या रूपात शेअरच्या आडरशिपचे रेकॉर्ड ठेवतात. आणि शेअरचे हस्तांतरण सुरक्षा इत्यादी काम करते. येथे सर्व शेअर विना कागद स्वरूपात ठेवले जातात आणि डिपॉझिटरी मध्ये ठेवलेले सर्व शेअर जशास तसे राहतात. डिपॉझिटरीच्या नोंदीत शेअरमध्ये गुंतविणारे गुंतवणूकदार बेनेफेशियल ऑफर घेतात आणि डिपॉझिटरी कंपनीचे रेकार्ड रजिस्टर्ड मालक होतात. अशा प्रकारे शेअरशी संबंधित समस्त हक्क शेअर मालकाचेच असतात.

डिपॉझिटरी आपल्या एजंटांना ज्यांना सामान्यपणे डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणतात-आपल्या अवणूकदाराशी संपर्क ठेवतात. ज्या प्रकारे आपण बँकेत आपला पैसा ठेवता आणि त्यातून देणे सहजतेने धनादेशाद्वारा करता त्याच प्रकारे गुंतवणूकदाराचे शेअर डिपॉझिटरी पार्टिसिपंट जवळ जमा राहतात आणि बँकेच्या चेक बुक प्रमाणे आपणास एक-एक बुक दिले जाते, ज्यामुळे आपण खूप सहजपणे देणे-घेणे करू शकता. याकरिता आपणास बँकेच्या खात्यासारखा एक खाते नंबर दिला जातो.

जर आपण आपला शेअर व्यवसाय डीपी च्या मार्फत करू इच्छीत असाल तर सर्वांत चांगले हे की, आपण त्याच डीपी चा उपयोग करा ज्याचा आपला दलाल उपयोग करतो. डीपी जवळ आपले शेयर डिमॅट करण्याची प्रक्रिया फारशी अवघड नाही. एखाद्या डी.पी. जवळ आपले डीमॅट खाते उघडल्यानंतर आपणास फक्त आपले शेअर रद्द करून त्याच्याकडे द्यावयाचे आहेत. सोबतच आपण एक डीमेंट रिक्वेस्ट फॉर्म (Demat Request Form) – भरून त्याला द्यावयाचा आहे ज्यात आपल्या शेअर्सचा फोलिओ संख्या सार्टिफिकेट नंबर व अन्य माहिती नोदविली जाते. साधारणपणे सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास जवळजवळ एक महिना लागतो. या प्रक्रियेच्या विस्तृत माहितीसाठी आपण कोणत्याही डी. पी. शी संपर्क करू शकता.

जर आपली इच्छा असेल तर आपण परत पुन्हा या प्रक्रियेचे (Rematerialiasation) री-मटेरियलायझेन करून पूर्ण स्वातंत्र्य घेऊन करू शकता. याला सर्टिफिकेटच्या रूपात बदलू शकता.

डीमटेरियलाझेनशी संबंधित सत्य

डीमॅट शेअर्सची खरेदी (Purchase of Demat Shares) पब्लिक इश्श्यूमध्ये गुंतवणूकदार डी. पीला सूचित करतो की त्याच्या अँलॉटेड शेअर्सना त्याच्याखात्यात जमा करावे. सेकंडरी मार्केटमधून शेअर खरेदी करण्याकरिता आपण डीपीला एक वेळ आदेश देऊ शकता.

आपण हे निश्चित करा, की आपला दलाल आपल्या शेअर्सना आपल्या क्लिअरिंग अकाउंटमधून आपल्या डिपॉझिटरी अकाउंटमध्ये बुक क्लोजरपूर्वी नोंद करतो किंवा नाहीं, जर शेअर्सची नोंद आपल्या दलालाच्या क्लिअरिंग अकाउंटमध्येच राहते तेव्हा कंपनी दलालालाच डिव्हिडंड वा बोनस देईल.

डीमॅट शेअर्सची विक्री (Sale of Demat Shares)

जर आपण आपले शेअर्स विकू इच्छिता तर आपण आपल्या डी. पीला हा आदेश द्याल, की आपण विकलेल्या शेअरच्या संख्येला आपल्या खात्यात टाकून द्यावे आणि आपल्या दलालाच्या क्लियरींग खात्यात जमा करावे. आपणास शेअर्स विकण्यासंबंधित हा आदेश आपल्या डीपी. ला द्यावा लागेल, ज्यामुळे आपण त्या डीमॅट स्लिपचा उपयोग कराल जी आपणास डीपीद्वारा खाते सुरू करताना दिलेली असते.

डीमॅट खाते आणि कार्यप्रणाली (Meaning and Working of Demat Account) डीमॅटद्वारा आपण आपल्या शेअर्सची खरेदी-विक्री करता, हा आपले शेअर्स सुरक्षित आणि सुविधाजनक ठेवण्याचा एक मार्ग आहे.

डीमॅट खात्यामध्ये आपल्याला नामांकनाची सुविधासुद्धा प्राप्त होते. आयपीओ राईट्‌स आणि बोनसमध्ये शेअर्सना सरल रीतीने गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केले जाते. आपणास डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप बुक नेहमी सुरक्षित ठेवले पाहिजे.

जर आपण नेहमी, वेळोवेळी व्यवहार करीत नसाल तर आपल्या डीमॅट खात्यासाठी दिलेल्या फ्रीझिंग सोयीचा उपयोग करा. आपण इंटरनेटच्या माध्यमातूनसुद्धा पूर्णपणे सुविधाजनक पद्धतीने आपले डीमॅट खाते मॉनिटर करू शकता. सी. डी. एस. एल. पी इंटरनेट सुविधा ‘हनी’ ने आपण स्वतःच्या डीमॅट खात्याची स्थिती जाणून घेऊ शकता आणि यामुळे आपणास होल्डिंगचे दैनंदिन मूल्यांकनसुद्धा मिळते.

या संशयापासून राहण्यासाठी की प्रतिनिधी दलालांचा अयोग्य वापर बदल होऊ नये म्हणून सी. डी. एस. एल. च्या प्रत्येक खात्याला विशेष नंबर दिला जातो. हा नंबर १६ अंकी असतो. पहिले ८ अंक डी. पी. आय. डी. आणि अंतिम ८ अंक क्लाएंट आय. डी. असतो. उदाहरणासाठी नमुना नंबर पुढीलप्रमाणे आहे-

डी. पी. आय. डी – १२४०१००५

क्लाएंट आय. डी. – ००४८०३२१

डीमॅट खात्यावर प्राप्त सुविधा

खालील सुविधा आपण डीमॅट खात्यावर मिळवू शकता-

१. लोन सुविधा:

आपण स्वतःच्या डीमॅट होल्डिंगवर कर्ज घेऊ शकता परंतु याकरिता आपणास आपल्या खात्याच्या सिक्यूरिटीजला कर्ज देणान्या बँकेकडे तारण (गहाण) ठेवावे लागेल.

२. स्पीड ई:

इंटरनेटद्वारे डिलिव्हरी सूचना देण्याची सोय आहे या सोयीसाठी आपण आपल्या डी. पी. ला सांगू शकता.

३. नामांकन सुविधा:

डीमॅट खात्यावर आपणास नामांकनाची सुविधा मिळते. वैयक्तिक वा संयुक्त खाते ठेवणाऱ्या व्यक्ती या सोयीचा उपयोग करू शकतात. खातेधारकाच्या मृत्युनंतर शेअर मिळविण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीला डी. पी. ला भेटून कायदेशीर कार्यवाही करावी लागते.

४. आय. डी. ई. ए. एस. (I. D. E. A. S.):

या सुविधेद्वारे आपण स्वतःचे होल्डिंग इंटरनेटवर पाहू शकता.


बोल्ड व नीट प्रणाली (Bolt and Neat Method)

शेअर्सला वाढता व्यवसाय आणि मध्यमवर्गीय जनतेपासून ते उच्च-वर्गापर्यंतच्या प्रतिस्पर्धेमुळे आज हा बाजार दिवसेंदिवस नवे शिखर गाठीत आहे. नवीन मापदंड ठरवीत आहे. आता स्टॉक एक्स्चेंजमध्ये उभे राहून बोली लावण्याच्या जागी आता हा संपूर्ण व्यवसाय आरामात ब्रोकर आपल्या कार्यालयातील कॉम्प्यूटरच्या बोल्ट नीट प्रणालीच्या माध्यमातून करतो. शेअर्सची खरेदी-विक्री करतो. बोल्ट बी. एस. ई. ची कॉम्प्यूटरकृत व्यवसायप्रणाली आहे आणि नीट एन. एस. ई. ची. हा सर्व कारभार सोमवार ते शुक्रवार सकाली ९.५५ ते सायं ३.३० पर्यंत केला जातो. या प्रणालीच्या साहाय्याने शेअरचा कारभार एक संपूर्ण भारतव्यापी स्वयंचलित कॉम्प्यूटरकृत नेटवर्कच्या माध्यमातून तात्काळ होल शकतो.

या प्रणालीचे अनेक लाभ झाले आहेत. सर्वप्रथम याच्या कारभारात पारदर्शकता वाढली आहे. आता गुंतवणूकदार शेअर्स खरेदी अथवा विक्रीचा आदेश नोंदवून ती त्वरित पूर्ण होताना पाहू शकतात. ते आता स्वतःचे सौदे एकदम त्या पैशात करू शकतात ज्यावर ते इच्छुक आहेत. आता देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला मनुष्य व्यवसायी अथवा गुंतवणूकदार या प्रणालीच्या माध्यमातून मुबईत असलेल्या व्यावसायिकासारखे काम करू शकतो.

फ्यूचर ऑप्शन (Future and Options): – फ्यूचर बाजारात फक्त काही विशिष्ट आणि निवडक शेअर्सचा कारभार असतो. नगदी बाजारात आपणास खरेदी आणि विक्री नगदी रुपयांनी करावी लागते. फ्यूचर बाजारात फक्त सौद्यांमध्ये झालेला फायदा अथवा नुकसान याचे नगदी परतावे मिळतात.

फ्यूचर बाजारात आपण खरेदी केलेल्या शेअर्सचे पैसे द्यावे लागत नाहीत आपण फक्त मार्जिन मनी फक्त देता जे आपण खरेदी केलेल्या शेअर्सच्या एकूण मूल्याच्या १० ते २० टक्के असू शकते. विभिन्न काँट्रॅक्टरचा मार्जिन मनी वेळोवेळी एक्सचेंजद्वारा निश्चित करण्यात येतो.

फ्यूचर्स कारभार शेअर व्यापान्यांना फार आकर्षक वाटतो कारण आजच्या युगात फक्त मार्जिनचे काही लाख देऊन व्यापारी त्यापेक्षा अनेक पटींनी व्यवहार करू शकतात पण ही दुधारी तलवार आहे. ज्यामध्ये जास्त फायद्याच्या लोभाने प्रचंड भारी नुकसानसुद्धा सहन करावे लागते. ‘फ्यूचर्स’ आणि ‘ऑप्शन्स’ अनुभवी व्यापारी आणि सट्टेबाजांकरिताच फक्त उपयुक्त आहे. साधारणपणे सामान्य गुंतवणूकदारास यापासून दूर राहण्यास सांगण्यात येते; पण जर आपली इच्छा असेल तर स्टँप ऑर्डरचा उपयोग करावा ज्यामुळे नुकसान कमी होईल.

ऑप्शन

हासुद्धा एक प्रकारे फ्यूचर्स व्यवसायासारखा आहे. जोपर्यंत एखादा गुंतवणूकदार एखाद्या करारावर ऑप्शन्स खरेदी करतो तेव्हा अवधी समाप्त होण्यापूर्वी ते कोणत्याही अशा भावाने खरेदी विक्रीसाठी एक प्रीमियम चुकवितो, ज्या भावाने त्याला नफा व नुकसान कमी होईल. जर तो करार संपविण्याच्या पर्यायांचा वापर करीत नाही तर त्याला त्या प्रीमियमचे नुकसान होईल. जो त्याने ऑप्शनच्या खरेदीसाठी अदा केला आहे. फ्यूचर्सच्या तुलनेत ऑप्शन जास्त सुरक्षित मानला जातो कारण फ्यूचर्समध्ये नुकसानीची कांहीही मर्यादा नसते.

ऑप्शन आणि फ्यूचर्सच्या व्यवसायात फार गुंगागुंत असते यात सखोल दूर दूरदृष्टीची अतिशय आवश्यकता असते. म्हणून नवीन गुंतवणूकदारानी यापासून दूर राहिले पाहिजे.

फ्यूचर्स बाजारात फक्त काही विशिष्ट आणि निवडक शेअर्सचा व्यवसाय असतो. नगदी बाजारात आपण खरेदी किंवा विक्री करताना नगदी पैशानी करता पण फ्यूचर्स बाजारात फक्त सौद्यात झालेला नफा वा तोटाच नगदी अदा केला जातो.

फ्यूचर्स बाजारात आपणास खरेदी केलेल्या शेअर्सचे पैसे द्यावे लागत नाहीत आपण फक्त मार्जिन मनी अदा करतो जो आपण खरेदी केलेल्या शेअर्सच्या एकूण किमतीच्या १० ते २० टाक्यांपर्यन्त असू शकतो. विभिन्न काँट्रॅक्टर्सचे मार्जिन मनी वेळोवेळी एक्सेचेन्ज निश्चित केला जातो.

फ्यूचर्स व्यवसाय शेअर व्यापाऱ्यांना तसा फार आकर्षक वाटतो करण आजच्या काळात फक्त मार्जिन मनीचे काही लाख अदा करून व्यापारी त्यापेक्षा अनेक पटींनी व्यवहार करू शकतात पण ही दुधारी तलवार. आहे. फ्यूचर्स आणि ऑप्शन्स अनुभवी व्यापारी आणि सट्टेबाजांसाठी उपयुक्त आहे. सरासरी साधारण गुंतवणूरकदाराला यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो; पण जर आपण यामध्ये नशीब अजमावून पाहत असाल तर असे अजमारवून पाहा की नुकसान कमीत कमी होईल.

सेबी (Securities and Exchange Board of Indian)

संसदेच्या मान्यतेने तयार झालेली सेबी ही भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे, जी शेअर बाजाराशी संबधित सर्व कार्यप्रणालीवर देखदेख करते. याचे सर्वांत प्रमुख काम म्हणजे गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित ठेवणे, ही कोणतीही कंपनी किंवा दलालाला त्याच्या अवधानिक वा बेकायदेशीर कार्य आणि एखाद्या धोकादायक वा फसव्या आचरणाला डोडावू शकते. त्याच्या व्यवसायावर बंदी घालू शकते. कोणत्याही कंपनीला पब्लिक इश्श्यू बाजारात आणण्यापूर्वी सेबीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते.

शेअर बाजार निर्देशांकाचा अर्थ काय आहे?

निर्देशांक मूलत: एका मापन यंत्रासारखे काम करतो ज्यामुळे बाजार आणि शेअर व्यवसायाच्या संपूर्ण व्यवहारांचा आढावा घेता येतो. दुसऱ्या शब्दात निर्देशांक मिळारूपाने त्या निवडक शेअर्सची सरासरी असते जवळजवळ पूर्ण शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करतात. या निवडक शेअर्समध्ये साधारणपणे लिक्विडिटीचे प्रमाण जास्त असते. बाजारात आणि गुंतवणूकदाराजवळ हे शेअर जास्त प्रमाणात असतात आणि व्यवसायातसुद्धा हे जास्त प्रमाणात असतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराला बाजारात तेजी राहील का मंदी हे जाणून ध्यायचे असेल तर त्याने फक्त त्या वेळेसचा निर्देशांक पाहण्याची आवश्यकता असते व यासाठी त्याला बाजारातील सर्व शेअर्सचे भाव जाणून घेण्याची गरज नसते. साधारणपणे निर्देशांक सर्व शेअर बाजाराचा द्योतक असतो.

निर्देशांकाच्या मदतीनेच म्युच्युअल फंड स्वतःच्या पोर्टफोलिओचे मूल्यांकन करतात काही म्युच्युअल फंड तर इंडेक्स फंडसुद्धा देतात ज्यामध्ये निर्देशांकात समाविष्ट कंपन्यामध्ये गुंतवणूक केली जाते यामुळे निर्देशांकासारखाच फायदा होतो.

बीएसईचा सेन्सेटिव्ह इंडेक्स ज्याला सामान्य भाषेत सेन्सेक्ससुद्धा म्हणतात भारतात सर्वांत जास्त उपयोगात आणला जाणाराहा सूचकांक आहे. याचे संघटन १९८६ मध्ये केले गेले. सेन्सेक्सचे मूळ वर्ष १९७८ – ७९ ठरविले गेले. त्या वर्षी सेन्सेक्सचे मूल्य १०० मानण्यात आले. सेन्सेक्समध्ये त्या ३० शेअर्सना सामावून घेतले जाते जे दैनिक व्यवसायाच्या आधारावर बाजारावर सर्वाधिक परिणाम करतात. प्रत्येक शेअरला बाजारातील त्याचे भांडवलीकरण एकूण शेअर्सची संख्या गुणिले शेअरचे भाव यावरून पाहिले जाते. याकरिता शेअर्सच्या भावात कोणत्याही बदलीमुळे सेन्सेक्स फार लवकर प्रभावित होतो.

दुसरा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे, एस. अँड पी. सी. निर्देशांक ज्याला सामान्यपणे ‘निफ्टी’ नावाने ओलखले जाते. हा नॅशनल स्टॉकचा मुख्य निर्देशांक आहे ज्यामध्ये जवळजवळ २० वेगवेगळ्या क्षेत्रांतील ५० शेअर्स समाविष्ट आहेत. एन. सी. ई. वर होणाऱ्या एकूण व्यवसायाच्या ६५ ते ७० टक्के व्यवसाय निफ्टी शेअर्समध्ये होतो.

सेंसेक्स व निफ्टी शेअर्सची यादी आपणास यांच्या वेबसाईटवर मिळते. शेअर खरेदी आणि विक्रीपूर्वी आपणास डी. पी. जवळ आपले डीमॅट खाते उघडावे लागते. जसे की, पूर्वी सांगितले होते. बी. एस. ई. व एस. एस. ई. वर फक्त डिमॅट प्रतिनिधीचाच व्यवसाय असतो.

जेव्हा आपण शेअर खरेदी करतो तेव्हा त्या सौद्याची पुष्टी मिळताच आपणास दलालाला पैसे देणे आवश्यक असते. दलाल कराचे कागद तयार करतो आणि उपदलाल हमीपत्र. अशा तर्हेने शेअर विकल्यावरसुद्धा आपणास करारपत्राची हमी मिळताच आपणास शेअर स्वतःच्या दलाल व उपदलालाच्या डीमॅट खात्यामध्ये जमा करावे लागतात. जेव्हा आपण शेअर खरेदी करतो तेव्हा शेअर अगोदर दलालाच्या डीमॅट खात्यामध्ये येतात. यानंतर आपण ते स्वतःच्या डीमॅट खात्याच्या तपशिलांसह शेअर आपल्या खात्यामध्ये जमा करणाने निर्देश देऊ शकता.

जेव्हा आपण शेअर विक्री करतो तेव्हा आपल्या डी. पी. ला निर्देश देऊन आपण हे शेअर आपल्या डिमॅट खात्यातून – काढून आपल्या दलालाच्या खात्यात जमा करता. याकरिता डी. पी. ची इंस्ट्रक्टर स्लिप देते वेळी त्यात दलालाच्या डीमॅट खात्याची माहितीसुद्धा समाविष्ट केली जाते. ही निर्देश देण्याची प्रणाली थोडी कठीण असते व सर्व डी.पी. वेग-वेगळ्या प्रणालीचा उपयोग करतात म्हणून याविषयी दलालाची मदत घ्यावी.


दलालाला निर्देश देणे

शेअर्सचा सौदा करण्यासाठी आपण आपल्या दलाल वा उपदलालाला मुख्यत: तीन प्रकारे निर्देश देऊ शकता,

  • फिक्स्ड प्राइस ऑर्डर वा लेखी ऑर्डर.
  • स्टॉप लॉस ऑर्डर
  • मार्केट ऑर्डर

१. फिक्स्ड प्राईस ऑर्डर (Fixed Price Order)

फिक्स्ड प्राईस ऑर्डर तो निर्देश असतो ज्यामुळे आपण मूल्याने शेअर खेरदी व विक्रीचे निर्देश देता. सरासरी गुंतवणूकदार दलाल कॉम्प्यूटरवर दिसणाऱ्या चालू भावापेक्षा थोडा जास्त वा थोडा कमी भावाने मूल्य निश्चित करतात. मार्केट ऑर्डरच्या तुलनेत फिक्स्ड प्राईस आँर्डरने आपण शेअर्सच्या भावात चढ-उतांरातील अनिश्चिततेपासून सुटका करून घेऊ शकता. हा निर्देश मोठ्या सौद्यासाठी वा त्या शेअर्ससाठी जास्त उपयुक्त असतो, ज्यामध्ये साधारणपणे व्यवसाय होत नाही. जर आपण एखाद्या पूर्वनिर्धारित भावाने शेअर खरेदी करणे व विकू इच्छीत असाल तर फिक्स्ड प्राईस ऑर्डरचा उपयोग करू शकता.

२. स्टॉप लॉस ऑर्डर (Stop Loss Order)

या निर्देशित गुंतवणूकदार एक निश्चित भावाने दलालाच्या कॉम्प्यूटरवर एक अन्य भावसुद्धा निर्धारित करतो, ज्याला ट्रिगर प्राईस म्हणतात. जसा बाजारात शेअरचा भाव या ट्रिगर प्राईसपर्यंत पोंहचतो आपली ऑर्डर सक्रिय होते ही ट्रीगर प्राईस ऑर्डर देते वेळी बाजारात चालू असणाऱ्या भावापेक्षा जास्त वा कमी असली पाहिजे, जी व्यापारी किंवा सट्‌टेबाज आपले नुकसान मर्यादित ठेवू इच्छितात किंवा पूर्वनिर्धारित स्तरावर फायदा कमावू इच्छितात ते स्टॉप लॉस ऑर्डरचा उपयोग करतात. बाजाराच्या चढ-उताराच्या परिस्थितीमध्ये ही उपयोगी सिद्ध होते.

१. जर आपण एक व्यापारी आहात, ज्याने शेअर खरेदी केले आहेत व विकले आहेत, पण बाजार उलट फिरल्यामुळे स्वतःस नुकसान होण्यापासून वाचवू पाहता. तेव्हा आपण स्टॉप लॉस ऑर्डरचा उपयोग आपले नुकसान मर्यादित करण्यासाठी करू शकता.

२. हे त्या गुंतवणूकदारासाठीसुद्धा उपयोगी आहे, जे शेअर खरेदी व विक्रीनंतर बाजारभावावर लक्ष ठेवीत नाहीत.

३. जर तांत्रिक विश्लेषण आपल्याला सांगते की, काही विशिष्ट पातळीनंतर शेअरच्या भावात तेजी वा मंदी येण्याची शक्यता आहे, तेव्हा स्टॉप लॉस ऑर्डर सदस्वतनि शेअरला तो पूर्वनिर्धारित स्तर पार केल्यानंतर फक्त खरेदी वा विक्री करू शकता. अनेक व्यापारी या ऑर्डरचा उपयोग तेव्हा करतात जेव्हा त्यांच्या विश्लेषणानुसार एका पूर्व निर्धारित पातळी पार केल्यानंतर शेअरचा भाव तेजीने वाढेल वा पडेल.

३. मार्केट ऑर्डर

या ऑर्डरचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा शेअर दलालाच्या कॉम्प्यूटरवर पाहिलेल्या बाजार भावावर शेअर खरेदी वा विक्री करू इच्छिता.

उदाहरणासाठी माना की, आपण एखाद्या कंपनीत १०० शेअर खरेदी व दलालाला मार्केट ऑर्डर देता. आता समजा की कॉम्प्यूटर आपल्याला दाखवितो की बाजारात चालू असलेल्या ४० रुपये. दर शेअर भावाने फक्त ६० शेअर उपलब्ध आहेत. बाकी ४० शेअर विकणारे काही अन्य लोक ४२ रुपये प्रतिशेअर मागणी करीत आहेत. अशा स्थितीमध्ये दलाल आपल्यासाठी ६० शेअर ४० रुपयांच्या भावाने आणि ४० शेअर ४२ रुपयांच्या भावाने खरेदी करील. बाजारातील जास्त चढउताराच्या वेळी वा एखाद्या मोठ्या सौद्याच्या वेळी या प्रक्रियेचे पालन करीत नसला तरच चांगले आहे हे त्या शेअर्ससाठीसुद्धा उपयुक्त नाही ज्याची बाजारात मागणी फार कमी आहे. मार्केट ऑर्डरचा उपयोग तेव्हाच करा जेव्हा आपण घाईने कोणतेही खरेदी वा विक्री करू इच्छिता आणि सौद्याच्या भावाविषयी अति चिंता करू नका.


प्रारंभिक परत्तावेज (Immature Document)

स्वतःचा व्यवसाय एखाद्या दलालासोबत सुरू करण्यापूर्वी आपणास खाते सुरू करण्यासाठी दोन फॉर्म भरावे लागतात-

  • क्लाएंट इंट्रोडक्टरी फॉर्म
  • ब्रोकर क्लाएंट अँग्रीमेंट

हे भरण्यासाठी आपला दलाल मदत करील. याकरिता आपणास आपले नाव, पत्ता, आयकर, पॅन नंबर, बँक खात्यांची माहिती वगैरे द्यावी लागते. या दोन्ही फॉर्म्सचे स्वरूप सेबीद्वारा निश्चित केले जाते. देशात इक्विटी कल्चर विकसित करण्यासाठी शेअर बाजारातने महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मुंबई शेअर बाजारात दररोज जवळजवळ २५०० कंपन्यांची ट्रेडिंग होते.

ट्रेडिंग सेटलमेंट (Trading Settlement)

सध्या शेअर बाजारात टी प्लस टू नियमाने आवश्यक रोलिंग सेटलमेंट होते. जगात फार कमी देशांच्या शेअर बाजारात टी प्लस टू सेटलमेंटची प्रक्रिया होत असल्यामुळे आज जगात भारतीय शेअर बाजाराची गणना अति आधुनिक शेअर बाजारात केली जाते. टी प्लस टू सेटलमेंट प्रक्रिया अंतर्गत गुंतवणूकदारांना विकलेल्या वा खरेदी केलेल्या शेअरची डिलिव्हरी वा पेमेंट शीघ्र करण्याच्या उद्देश्याने आहे. टी प्लस टू च्या अंतर्गत ट्रेडिंगच्या दर तिसऱ्या दिवशी शेअर्सचे पे-इन आणि पे आऊट होते. देशात शेअर्समध्ये डिमटेरियालायझेशन (डिमॅट) व्यवसायामुळे सेटलमेंट प्रक्रिया गतिमान करण्यात शेअर बाजार सफल झाला आहे.

लिलाव प्रक्रिया (Auction Process)

त्वरित सेटलमेंट प्रक्रियेसोबत डिमॅट सुविधासुद्धा विकसित केल्यामुळे शेअरची लिलाव संख्या नियंत्रित राहिलेली आहे. पे-इनच्या निर्धारित तारखेपर्यंत जर एखादा गुंतवणूकदार आपल्या दलालाला शेअरची डिलिव्हरी मिळविण्यात अयशस्वी झाला तर आवश्यक लिलावाची प्रक्रिया सुरु केली जाते. याकरिता गुंतवणूकदारांसाठी वेळेवर शेअर्सची डिलिव्हरी देणे अत्यंत महत्वाचे असते.

सर्किट ब्रेकर (Circuit Breaker)

शेअर बाजारात एखाद्या स्क्रिपमध्ये असाधारण चढ-उतार झाला तर त्याच्या चढणे व पडण्याला मर्यादित ठेवण्यासाठी सर्किट ब्रेकरचा उपयोग केला जातो. सर्किट ब्रेकरची मर्यादा २ टक्के ते २० टक्क्यांपर्यंत असते. जरी डेरिव्हेटीव्ह सेगमेंटमध्ये समाविष्ट स्क्रिप्ट पासून गेले आहे. शेअर बाजार वेळोवेळी परिस्थिती लक्षात घेऊन सर्किट ब्रेकर मध्ये फेरबदल करीत राहतो.

पुढे वाचा:

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *